Friday, 11 April 2014

स्पर्श






पहिला स्पर्श पहिला गंध
तुझ्या प्रेमाचा तो सुंदर बंध...
तुझी आस तुझाच ध्यास
आणि तूच माझ्या स्वप्नांची आरास....
आपल नात देई मला माझ्या नव्या अस्तित्वाचा ठाव
जणू भासे मला विरह सागरात सापडलेली नवी लाट....
अशी आहे माझी तुझी कविता, मोरपिसाचा हळुवार स्पर्श
अन  तुझ्या आठवणीने नकळत निर्माण होणारा हर्ष....

Wednesday, 8 January 2014

कविता तुझी माझी







वाटले नाही कधी असा अचानक तू येशील
आणि अंतरीच्या भावना शब्दरूपी कविता होतील....
एका अनाहत वळणावर भेटलो आपण
अन एकमेकांच्या मनीचे झालो दर्पण....
रुसवे फुगवे हसणे रडणे वेगळच होत आपले विश्व
सगळ्यांच्या नजरेआड होत एक छोटस ताटव...

Tuesday, 7 January 2014

भास




चाहूल लागता सख्याची मन हिंदोळ्यांवर झुले...

स्पर्श होता सुखाचा आसमंत हा उजळे...

अजाण होते विसाव्याचे ठिकाण माझे...

विरून गेल्या दिशा तो गोड भास झाला...

निश्ब्ध झाले आता मी सख्याच्या समोर...

हवाहवासा असा तो त्रास आज झाला.....